शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 9:26 PM

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हंगामामुळे वाढला वाद राज्यपाल व कुलपती यांच्याकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.डॉ. अभिषेक हरदास यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, विद्यापीठाच्या झालेल्या तोडफोडीसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात यावे. तोडफोडीच्या घटनेनंतर विद्यापीठाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या नुकसानापोटी भरपाई ही कुलगुरू यांच्याकडून वसूल करण्यात यावी. या तक्रारीत महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टचा हवाला देत स्पष्ट केले की, विद्यापीठाला ४५ दिवसाच्या आत निकाल घोषित करणे गरजेचे आहे. वेळेत निकाल घोषित करू न शकल्यास त्याची माहिती राज्यपाल व कुलपती यांना देणे गरजेचे आहे. पण विद्यापीठ प्रशासनाने अशी कुठलीही माहिती राजभवनला दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तक्रार न करता, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. विद्यापीठाची भूमिका लक्षात घेता, राज्य सरकारने तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. कुलगुरु यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी. शुक्रवारी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी बी-कॉम अभ्यासक्रमाच्या निकालावरून विद्यापीठात निदर्शने केली होती. या दरम्यान जोरदार तोडफोड करण्यात आली होती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी