शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

राजधानी एक्स्प्रेस आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 9:53 PM

सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्या कारणांचा शोध घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्या कारणांचा शोध घेणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२४३७ राजधानी एक्स्प्रेस नागपूरवरून बुधवारी रात्री निजामुद्दीनकडे रवाना झाली. नरखेड ते दारीमेटा दरम्यान अचानक एसएलआर कोचमधून धुर आणि ठिणग्या निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने त्वरीत वॉकी टॉकीवरून लोकोपायलटला याची सुचना दिली. लोकोपायलटने तातडीने गाडी थांबविली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आग लागलेला एसएलआर कोच वेगळा करण्यात आला. दीड तासानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतु तो पर्यंत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची रेल्वे मुख्यालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. गुरुवारी घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. समितीत कोण सदस्य राहतील याबाबत रेल्वे प्रशासनाने माहिती देण्याचे टाळले. समितीत तीन सदस्य राहणार असल्याची माहिती असून नागपूरचे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एन. के. भंडारी तपासात सहकार्य करणार आहेत. समिती घटनेची चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.आगीमुळे विलंब झालेल्या गाड्याराजधानी एक्स्प्रेसला आग लागल्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांना विलंब झाला. यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस नरखेडमध्ये रात्री ९.५७ ते सकाळी ४.२७ पर्यंत उभी होती. १२१५९ अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसला काटोलमध्ये रात्री १०.२६ ते सकाळी ४.३१ पर्यंत थांबविण्यात आले. १२८०७ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला काटोलमध्ये रात्री २ ते सकाळी ४.३९ पर्यंत थांबविण्यात आले. १८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेसला कळमेश्वरमध्ये रात्री ११.३० ते सकाळी ४.२५ पर्यंत थांबविण्यता आले. १२६२५ तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला भुसावळमध्ये रात्री ३.३० ते सकाळी ४.३० पर्यंत थांबविण्यात आले. दिल्ली मार्गावर नागपूर रेल्वेस्थानकावर आलेली १२६४६ संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास, १९६०४ अजमेर हमसफर एक्स्प्रेस २ तास आणि १६०३१ अंदमान एक्स्प्रेस सकाळी ५.३० पर्यंत रेल्वेस्थानकावर उभी होती.

 

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसfireआग