शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महाविद्यालयांना ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: July 25, 2014 00:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांत किमान नियमित शिक्षक नेमणुकीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार व्यावसायिक व अव्यावसायिक

नागपूर विद्यापीठ : किमान शिक्षक नियुक्तीसंदर्भात नवीन अधिसूचना जारीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांत किमान नियमित शिक्षक नेमणुकीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना आता ५० टक्के शिक्षक नियुक्तीकरिता ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज सादर करताना महाविद्यालयांना हमीपत्र सादर करण्याचेदेखील निर्देश ‘बीसीयूडी’(बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट) संचालकांकडून देण्यात आले आहेत.२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची ५ आॅगस्टपूर्वी नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली होती. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट होती. परंतु महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला अहवाल मागील आठवड्यात विद्यापीठाकडे सादर केला. विद्वत परिषदेद्वारा प्रदान करण्यात आलेले अधिकार तसेच महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम १४ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी गुरुवारी समितीच्या शिफारशींना मान्यता दिली. यासंदर्भात ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी सायंकाळी अधिसूचना जारी केली.या अधिसूचनेनुसार सर्व संलग्नित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांपैकी ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक ठेवण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विद्याशाखेत शिक्षकांची नियुक्ती करून विद्यापीठाची मान्यता प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही अपरिहार्य कारणास्तव महाविद्यालयाला ३१ आॅक्टोबरपर्यंत ५० टक्के आवश्यक शिक्षक नियुक्ती करणे शक्य झाले नाही तर कुलगुरू वेळ वाढवून देऊ शकतील.(प्रतिनिधी)अधिसूचनेतील प्रमुख अटी५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.उर्वरित शैक्षणिक भाराची पूर्तता करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावर योग्यताप्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी.स्थापनेला ५ वर्ष पूर्ण न झालेल्या महाविद्यालयांना अट लागू नसेल. अशा महाविद्यालयांना किमान पूर्णकालीन प्राचार्य किंवा कार्यभार पूर्ण होत असल्यास किमान एका पूर्णकालीन विद्यापीठ मान्यताप्राप्त शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक राहील.अटींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचीविद्यार्थ्यांचे नामांकन अर्ज विद्यापीठात सादर करीत असताना अटींचे पालन करत असल्याचे हमीपत्र दाखल करणे.३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्णवेळ मान्यताप्राप्त शिक्षकांची यादी विद्यापीठाला सादर करणे बंधनकारक राहील.