शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

संग्रह बाबासाहेबांच्या दुर्मिळ डाक तिकिटे अन् नाण्यांचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:38 AM

अनेकांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातच नव्हे तर जगभरात अनुयायी विखुरलेले आहेत.

ठळक मुद्दे‘फर्स्ट डे कव्हर’पासून कम्बोडियातील १०० रुपयांची नोटही संग्रही : रूपकिशोर कनोजियांनी जोपासलाय छंद

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातच नव्हे तर जगभरात अनुयायी विखुरलेले आहेत. हे अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृती वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. अनेकांकडे बाबासाहेबांचे फोटो, त्यांचे शिल्प, त्यांचे ग्रंथ संग्रही आहेत. याच अनुयायात रूपकिशोर कनोजिया यांनीसुद्धा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांवर डाक विभागाने प्रकाशित केलेल्या पोस्टाच्या तिकिटा दुर्मिळ असे फर्स्ट डे कव्हर संग्रही केले आहे. तर रामसिंग ठाकूर यांच्याकडे भारत सरकारने चलनात आणलेल्या बाबासाहेबांच्या दुर्मिळ नाण्यांचा संग्रह आहे.शहरात रूपकिशोर कनोजिया संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या संग्रहात बाबासाहेबांवर भारत सरकारच्या डाक विभागाने प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर व पोस्टाच्या तिकिटा संग्रही करून ठेवल्या आहेत. यात बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारने १९९१मध्ये प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर, ३० सप्टेंबर २०१५ मध्ये बाबासाहेब आणि संविधानावर काढलेले फर्स्ट डे कव्हर, तिरुवनंतपुरम सरकारने चैत्यभूमी व बाबासाहेबांवर २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेले पोस्टाचे तिकीट, भारतरत्न डॉ. आंबेडकर दूरसंचार प्रशिक्षण संस्था जबलपूर यावर पोस्टाने काढलेले फर्स्ट डे कव्हर, पोस्टाने दीक्षाभूमी व बाबासाहेब यांचे चित्र असलेले पोस्ट तिकीट त्यांच्या संग्रही आहेत. हा ठेवा अतिशय दुर्मिळ आहे. तसेच गौतम बुद्धांचे चित्र असलेली कम्बोडियातील १०० रुपयांची नोट, भगवान गौतम बुद्धांच्या जन्माला २५०० व २५५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्टाने काढलेले फर्स्ट डे कव्हर त्यांच्या संग्रहात आहे.रामसिंगच्या संग्रहातही दुर्मिळ नाणेनाण्यांचा संग्राहक असलेला रामसिंग याने भारत सरकारने चलनात आणलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले नाणे संग्रही करून ठेवले आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २०१५ मध्ये १० आणि १२५ रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध केले होते. हे नाणे रामसिंगने जतन करून ठेवले आहे. तर बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेले १ रुपयाचे नाणेही त्यांच्याकडे बघायला मिळते.हा अनमोल ठेवाबाबासाहेबांचे नाणे असो की डाक तिकीट अतिशय दुर्मिळ आहे. त्यांचा हा स्मृती ठेवा आमच्या संग्रहात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्यासाठी हा अनमोल ठेवा आहे, अशी भावना रूपकिशोर आणि रामसिंग यांनी व्यक्त केली.