शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 23:35 IST2026-04-13T23:32:58+5:302026-04-13T23:35:18+5:30

Nagpur Drugs Crime: डीआरआयने कारवाई करत महिला अटक केली, तर तिच्या साथीदाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

Cocaine worth Rs 4.26 crores found in shampoo bottle, Cinestyle operation on Rajdhani Express in Nagpur | शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई

शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई

-नरेश डोंगरे,नागपूर
Nagpur Crime: दिल्लीहून बंगळुरूसाठी निघालेल्या महिलेला राजधानी एक्सप्रेसमध्ये ट्रेस करून तिच्या जवळून ४ कोटी, २६ लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआयची) मुंबई झोनअंतर्गत नागपूर प्रादेशिक युनिटने (एनएआरयू) रविवारी ही सिनेस्टाईल कारवाई केली. 

या कारवाईमुळे कोकेनसारख्या महागड्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींना जबर झटका बसला आहे.

गाडी क्रमांक २२६९२ हजरत निजामुद्दीन – केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मधून कोकेनची तस्करी केली जात असल्याची टीप डीआरआयच्या नागपूर युनिटला मिळाली. त्यावरून युनिटच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने कारवाईची तयारी करत सापळा रचला. 

नेहमीप्रमाणे ही गाडी रविवारी नागपूर स्थानकावर पोहचताच गाडीतील एका संशयीत महिलेवर अधिकाऱ्यांनी नजर रोखली. तपास सुरू झाला असतानाच ही गाडी पुढे निघाली. अजनी स्थानकावर ती थांबली असता संशयित महिलेला उतरवून घेण्यात आले. 

तिच्या जवळच्या साहित्याची तपासणी करून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ४ कोटी, २६ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली.

बाटली शॅम्पूची, आत लपवले कोकेन

डीआरआयचे तपास अधिकारी महिलेच्या सामानाची तपासणी करताना काही वेळेसाठी संभ्रमात सापडले होते. कारण तिचे कपडे, सौंदर्य प्रसाधने आणि प्रवासादरम्यान आवश्यक कपडे, आवश्यक रक्कम एवढेच सामान तिच्याजवळ आढळले. 

मात्र, कपड्यांमध्ये ठेवलेल्या दोन शॅम्पूच्या बाटल्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्या बाटल्यांमधील द्रव काढल्यानंतर त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या ५० सीलबंद कॅप्सूल्स सापडल्या. या कॅप्सूल्समध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर स्वरूपात कोकेन लपवून होते. फील्ड ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर तो पांढरा पावडर वजा पदार्थ कोकेनच असल्याचे निष्पन्न झाले.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

महिलेजवळचे ८५३ ग्रॅम कोकेन एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आले असून संबंधित महिलेला रविवारी १२ एप्रिला अटक करण्यात आली. प्राथमिक चाैकशीनंतर महिलेला कोर्टात हजर करण्यात आले. 

न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. महिलेच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याचे संकेत संबंधित सूत्रांनी दिले आहेत.

 

Web Title : नागपुर राजधानी एक्सप्रेस में 4.26 करोड़ का कोकीन जब्त

Web Summary : डीआरआई ने नागपुर में राजधानी एक्सप्रेस में एक महिला से 4.26 करोड़ रुपये का कोकीन जब्त किया। कोकीन शैम्पू की बोतलों में छिपाया गया था। महिला को गिरफ्तार कर न्यायिक हिरासत में भेज दिया गया है।

Web Title : Cocaine worth ₹4.26 crore seized in Nagpur Rajdhani Express

Web Summary : DRI seized ₹4.26 crore worth of cocaine from a woman on the Rajdhani Express in Nagpur. The cocaine was hidden in shampoo bottles. The woman has been arrested and is in judicial custody.