मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेट

By आनंद डेकाटे | Updated: November 23, 2025 18:45 IST2025-11-23T18:44:52+5:302025-11-23T18:45:48+5:30

या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

cm devendra fadnavis visits agrovision agricultural exhibition | मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेट

मुख्यमंत्री फडणवीस यांची ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला भेट

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ॲग्रोव्हिजन-२०२५ या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या प्रदर्शनीचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसेच ॲग्रोव्हिजनचे सल्लागार परिषदेचे चेअरमन डॉ. सी.डी. मायी हे उपस्थित होते.

ॲग्रोव्हिजनची ही आतापर्यंतची सोळावी प्रदर्शनी आहे. याशिवाय फाऊंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील विविध संस्था आणि कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

Web Title : मुख्यमंत्री फडणवीस ने नागपुर में एग्रोविजन कृषि प्रदर्शनी का दौरा किया

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने नागपुर में एग्रोविजन-2025 कृषि प्रदर्शनी का दौरा किया और आधुनिक कृषि तकनीकों का पता लगाया। उन्होंने नितिन गडकरी और अन्य लोगों के साथ एक छोटे से कार्यक्रम में भाग लिया। सोलहवीं एग्रोविजन प्रदर्शनी में फाउंडेशन की 10वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में एक विशेष कॉफी टेबल बुक का विमोचन भी हुआ।

Web Title : CM Fadnavis Visits Agrovision Agricultural Exhibition in Nagpur

Web Summary : Chief Minister Fadnavis visited the Agrovision-2025 agricultural exhibition in Nagpur, exploring modern farming technologies. He attended a small event with Nitin Gadkari and others. The sixteenth Agrovision exhibition also saw the release of a special coffee table book celebrating the foundation's 10th anniversary.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.