बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 01:05 IST2025-12-15T01:03:26+5:302025-12-15T01:05:10+5:30
नागपुरातील पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी
नागपूर: पारडी येथे अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारडी येथील भवानी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.
नागपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची श्री भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर येथे भेट घेतली. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून बिबट्याला पकडण्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. #Maharashtra#Nagpurpic.twitter.com/psmyzSuh3r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 14, 2025
नागपुरातील गजबजलेल्या पारडी परिसरातील शिवनगर वस्तीत १० डिसेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. घरांमध्ये घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. जखमींना पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आणि संबंधित डॉक्टरांना उपचाराच्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.