शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

नागपुरात आभाळ फाटले! उमरेडमध्ये एक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:04 PM

शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, हजारो घरात शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत दिवसभरात ७७.२ मि.मी. पावसाची नोंद नागपूर वेधशाळेने केली आहे. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजतापर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. संपूर्ण शहरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. मेडिकलमध्ये अनेक वॉर्डात पाणी शिरल्याने, रुग्णांना गैरसोय सहन करावी लागली. 
शाळांना सुटीशुक्रवारी झालेला जोराचा पाऊस आणि पुढचे दोन दिवस वेधशाळेकडून प्राप्त झालेला अति ते अतिवृष्टीच्या इशाºयाने दक्षता म्हणून शहरातील शाळा व्यवस्थापकांनी शनिवारी शाळांना सुटी जाहीर केली आहे.पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारानागपूर वेधशाळेने पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देणारे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केले आहे. या अलर्टमध्ये २४ तासात साधारणत: ६५ ते १२५ मि.मी. पावसाची नोंद होते. विशेष म्हणजे, पावसाच्या तीव्रतेकडे सातत्याने लक्ष दिले जात असून, शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पावसाचा अंदाज व्यक्त करून, हा इशारा अति ते अतिवृष्टी दर्शवणारा ‘रेड अलर्ट’मध्ये रूपांतरित केले जाण्याची शक्यता बळावली आहे. पश्चिम बंगालच्या सागरातील वायूबदलामुळे ओडिशा क्षेत्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडकडे सरकला असल्याने, अति ते अतिवृष्टीच्या शक्यतेला अधिक बळ मिळाल्याचे, वेधशाळेकडे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर