पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:30 PM2020-06-05T23:30:43+5:302020-06-05T23:33:07+5:30

मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.

The close relationship between the environment and the brain: Chandrasekhar Meshram | पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

Next
ठळक मुद्देकोरोनासारखे आजार टाळायचे असल्यास पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाचे स्वास्थ्य हे पृथ्वीच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण व मेंदूचा घनिष्ठ संबंध असतो. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या रोगामुळे पर्यावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘कोविड-१९’ हा प्राणिमात्राची संबंधित रोग आहे. मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, कोरोनासंदर्भात आणखी एक बाब संशोधनातून सामोर आली. या रोगामुळे फुफ्फुसे निकामी होतात आणि रुग्ण दगावतो. मेंदूमध्ये विषाणूचा प्रभाव झाल्याने विशेषत: मेंदूमध्ये श्वासाचे जे केंद्र आहे, त्यात बिघाड झाल्यामुळे असे होते.

प्रदूषणामुळे १८ लाख लोक मृत्युमुखी पडतात
डॉ. मेश्राम म्हणाले, पर्यावरणातील प्रदूषणामुळे व वायुप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जगात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे ९० लोक मृत्युमुखी पडतात तर भारतात ही संख्या साधारण १८ लाख एवढी आहे. एड्स, क्षयरोग व मलेरिया या सर्वांमुळे जेवढे लोक दगावतात त्यापेक्षा जास्त लोक एकट्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दगावतात.

३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूत
नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हे लक्षात आले की, ३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील ९० टक्के लोक प्रदूषित वायूमध्ये श्वास घेतात. यामुळे पक्षाघाताशिवाय, स्वमग्नता, लक्षात न राहणे, एकाग्रता न होणे हे रोग लहान मुलांमध्ये होतात, तर मोठ्यांमध्ये स्मृतिभ्रंश व पार्किन्सनसारखे आजार होतात. आवाजातील प्रदूषणामुळे ‘आॅबर्शन’ाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातूनही समोर आले असल्याचेही डॉ. मेश्राम म्हणाले.

भारतात दोन तृतियांश लोकांकडून घातक इंधनाचा वापर
जगातील ३०० कोटी लोक स्वयंपाकासाठी घातक इंधनाचा वापर करतात. भारतात दोन तृतियांश लोक घातक इंधनाचा वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सर्वाधिक २० प्रदूषित शहरे आहेत त्यापैकी १६ शहरे एकट्या भारतात आहे. यामुळे आजच्या घडीला सर्वांनी मिळून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: The close relationship between the environment and the brain: Chandrasekhar Meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.