शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सफाई कर्मचाऱ्यांनी लावले लक्ष्मीनगर झोनला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:12 AM

जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे तब्बल ७५ टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कटले. याविरुद्ध लक्ष्मीनगर झोनमधील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले. निदर्शने केली.

ठळक मुद्देजीपीएस घड्याळीच्या त्रुटीने ७५ टक्के कर्मचाºयांचे वेतन कटले कर्मचाºयांनी केले काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीपीएस घड्याळीच्या त्रुटीमुळे तब्बल ७५ टक्के सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन कटले. याविरुद्ध लक्ष्मीनगर झोनमधील संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले. निदर्शने केली. रास्ता रोको आंदोलन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर नंदा जिचकार, सत्ता पक्षनेते संदीप जोशी यांच्यासह अनेक नगरसेवक व अधिकारी झोन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना शांत केले. प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन मॅन्युअली जारी करण्याचे निर्देश दिले. यानंतर सकाळी ११ वाजता सफाई कर्मचारी कामावर परतले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच गांधीबाग झोनच्या कर्मचाऱ्यांनी मनपा मुख्यालयात जाऊन जीपीएस घड्याळीतील त्रुटींकडे लक्ष वेधले होते. ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन कटले होते. रवींद्र ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रकरण शांत झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर झोनमध्ये ५५४ सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आले आहे. शनिवारी या महिन्याच्या पगाराची स्लीप जारी करण्यात आली. जीपीएस घड्याळीने वेतन जोडले असल्याने जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन शून्य ते १५ दिवसापर्यंतचेच निघाले. सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणाऱ्या जमादारांची उपस्थिती शून्य आहे. त्यामुळे त्यांचे वेतनच निघाले नाही. सोमवारी सकाळपासूनच लक्ष्मीनगर झोनच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. संतप्त कर्मचारी सकाळी कार्यालयात आले आणि त्यांनी गेटला टाळे ठोकले. याची सूचना मिळताच महापौर जिचकार आणि सत्ता पक्षनेते जोशी झोन कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत काही विरोधी पक्षाचे नगरसेवकही होते. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर सफाई कर्मचारी कामावर परतले.सफाई कर्मचाऱ्यांचे लोकेशन दाखविते थायलंड-अमेरिकाआरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जीपीएस घड्याळीमधील त्रुटीमुळे येणाऱ्या दिवसात आणखी समस्या निर्माण होतील. कारण ही घड्याळ सफाई कर्मचाऱ्यांचे लोकेशन कधी थायलंड तर कधी अमेरिका दाखवीत असते. अर्धा तास ते दोन तासाचा लाईव्ह डाटा येतो. याशिवाय अनेक तांत्रिक त्रुटी आहेत, ज्या दूर केल्यानंतरच जीपीएस घड्याळीच्या अटेंडन्सला वेतनाशी जोडले जावे. अन्यथा प्रत्येक महिन्यात झोन कार्यालयात अशीच समस्या निर्माण होत राहील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन