स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूरसाठी १०० सूचना पेट्या लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:55 AM2019-11-29T11:55:44+5:302019-11-29T11:57:17+5:30

शहराच्या समग्र विकासासाठी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून शहरात १०० सूचना पेट्या लावण्यात येत आहेत.

For the clean Nagpur, Sundar Nagpur, there will be 100 suggestion boxes | स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूरसाठी १०० सूचना पेट्या लागणार

स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूरसाठी १०० सूचना पेट्या लागणार

googlenewsNext
ठळक मुद्दे१ डिसेंबरपर्यंत स्वीकारणार सूचनानागरिकांच्या सहभागातून समग्र विकास आराखडा तयार करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या समग्र विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे,उत्तम व्हावे याबद्दल अनेकांकडे अनेक योजना असतात. या योजनांचा वापर करून आपल्या शहराचा विकास साधण्याच्या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून शहरात १०० सूचना पेट्या लावण्यात येत आहेत. आज शुक्रवारपासून या सूचना पेट्या नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत.
शहराच्या समग्र विकासाबाबत नागरिकांच्या सूचना मागवून त्यावर योग्य कार्यवाही करून शहरामध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरातील विविध १०० ठिकाणी सूचना पेट्या लावण्यात येत आहेत. या सूचना पेट्यांमध्ये २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीमध्ये सूचना नोंदविता येतील. आमंत्रित सर्व सूचनांचे एकत्रिकरण करून शहराच्या समग्र विकासाकरिता आराखडा तयार करण्यात येणार आहे.

या ठिकाणी लागणार पेट्या
शहरातील एकूण १०० ठिकाणी सूचना पेट्या लागणार आहेत. लक्ष्मीनगर झोनमधील बजाजनगर उद्यान, साहस कॉलनी उद्यान, तात्या टोपे नगर उद्यान, दीनदयालनगर उद्यान, प्रशांतनगर उद्यान, पी.एम.जी. सोसायटी उद्यान नरेंद्रनगर, काँग्रेसनगर उद्यान, कॉस्मोपॉलिटीन सोसायटी उद्यान, मेजर सुरेंद्रदेव पार्क धंतोली, अध्यापक ले-आऊट उद्यान, सुर्वेनगर उद्यान, शास्त्री ले-आऊट उद्यान खामला, यशोदानगर उद्यान, राजेंद्रनगर उद्यान, धरमपेठ झोनमधील काछीपुरा उद्यान, अभ्यंकरनगर उद्यान, रविनगर उद्यान, उत्कर्षनगर उद्यान, दगडी पार्क उद्यान, मेजर आनंद खरे उद्यान (लेंड्रा पार्क), जागृती कॉलनी खेळाचे मैदान, अंबाझरी उद्यान, ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्रॉफिक पार्क उद्यान, शिवाजीनगर उद्यान, शंकरनगर उद्यान, छोटी धंतोली उद्यान, हनुमाननगर झोनमधील रमाबाई आंबेडकर उद्यान चंदननगर, सच्चिदानंद नगर उद्यान, संतोषीमाता व रघुजीनगर पोलिस क्वॉर्टर उद्यान, महात्मा गांधी उद्यान हनुमाननगर, रेशीमबाग उद्यान, पूर्व बालाजीनगर उद्यान, राममंदिर चंदननगर उद्यान, सुदर्शनधाम उद्यान नंदनवन, धंतोली झोनमधील त्रिशरण बौद्ध विहार उद्यान, बालभवन उद्यान जवळील गांधीसागर तलाव सुभाष रोड, भाऊजी पागे उद्यान, उज्ज्वलनगर उद्यान, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, उल्हासनगर उद्यान, नेहरूनगर झोनमधील त्रिशताब्दी उद्यान जुना नंदनवन, आझाद पार्क उद्यान, लक्ष्मीनारायण उद्यान, दर्शन कॉलनी उद्यान आयुर्वेदिक ले-आऊट सक्करदरा, गांधीबाग झोनमधील गांधीबाग उद्यान, चिटणवीसपुरा उद्यान, बरबटे उद्यान लकडगंज, मेचीपुरा बगडगंज उद्यान, तुळशीबाग उद्यान, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर हाऊसिंग बोर्ड कॉलनी उद्यान शांतीनगर, शांतीनगर उद्यान (जुना), लालबहादुर शास्त्री उद्यान पाचपावली रेल्वे गेट, नामदेव उद्यान, तुळशीनगर उद्यान, लकडगंज झोनमधील भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान गरोबा मैदान, वैष्णोदेवी उद्यान गरोबा मैदान इस्ट वर्धमाननगर रोड, आसीनगर झोनमधील गुरुनानकपुरा उद्यान, सम्राट अशोक विहार उद्यान, लष्करीबाग उद्यान, तक्षशीलानगर उद्यान, मंगळवारी झोन अ‍ॅड. सखाराम पंत मेश्राम उद्यान (मंगळवारी उद्यान), सुगत कॉलनी उद्यान, नामांतर शहीद स्मारक उद्यान, शीलानगर उद्यान, के.टी.नगर नक्षत्रनगर उद्यान, जपानी गार्डन यासह नागपूर सुधार प्रन्यासचे दत्तात्रयनगर व त्रिमूर्तीनगर उद्यान तसेच शंकरनगर, सीताबर्डी मुंजे चौक, प्रतापनगर, सदर, इतवारी, मेडिकल चौक, बेसा रोड, अजनी, हिंगणा टी-पॉईंट येथील हल्दीराममध्ये तर बिग बाजार, साई मंदिर वर्धा रोड, टेकडी गणेश मंदिर, एम्प्रेस मॉल, परसिस्टन्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सेतू केंद्र, लक्ष्मीनगर चाय टपरी, शेवाडकर उद्यान, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया रेल्वे स्टेशनजवळ आदी ठिकाणी सूचना पेट्या लागणार आहेत. करिता नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना मनपापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Web Title: For the clean Nagpur, Sundar Nagpur, there will be 100 suggestion boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.