नागपूर शहरातील ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करा; महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 03:57 PM2021-02-20T15:57:46+5:302021-02-20T15:58:21+5:30

Nagpur News नागपुरात ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करण्यात यावे असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी दिले.

Classes 5 to 8 in Nagpur city should be closed immediately; Mayor's instructions | नागपूर शहरातील ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करा; महापौरांचे निर्देश

नागपूर शहरातील ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करा; महापौरांचे निर्देश

Next
ठळक मुद्देकॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी नगरसेवकांचे सहकार्य घ्या

                                                                                                                                                                              

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासोबतच होम सर्व्हेच्या चमूंमध्येही वाढ करण्यात यावी, ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करण्यात यावे, महाविद्यालयाचे वर्ग आॅनलाईन पद्धतीने पूवीर्सारखे घेण्यात यावे, नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, असे शिकवणी वर्ग बंद करण्यात यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी दिले. महापौरांनी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट देवून कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यावेळी उपस्थित होते.

'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करीत दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, शासन, प्रशासनाने वेळोवेळी इशारा देऊनही दिशानिदेर्शाचे पालन होत नाही. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले. अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होत असली तरी दंड हा यावरील उपाय नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, यात नगरसेवकांचा सहभाग घेतल्यास प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल,असे आवाहन महापौरांनी केले. संजय निपाणे यांनी नियंत्रण कक्षामधून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

अधिक रूग्ण असलेल्या भागात सर्वांची चाचणी

व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असल्यास नियमानुसार कारवाई करा, कोरोना नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्या, ज्या परिसरातून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत असतील अशा परिसरात सर्वांची चाचणी करण्यात यावी, आर. आर. टी. चमूंची संख्या वाढवावी, रुग्णांचे समुपदेशन ,जनजागृती करण्याचीही करण्यात यावी. आशा वर्कर आणि परिचारिकांचीही संख्या वाढविण्याचीही सूचना केली. महापौरांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Web Title: Classes 5 to 8 in Nagpur city should be closed immediately; Mayor's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.