कुत्र्यावरून हाणामारी : सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:00 IST2018-04-07T23:00:12+5:302018-04-07T23:00:27+5:30
पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

कुत्र्यावरून हाणामारी : सात जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
प्रल्हाद दशरथ भावरकर (५०) असे जखमीचे तर फुलसिंग दुलीचंद पटेल (४३), नीरज फुलसिंग पटेल (२०), अनिकेत फफलसिंग पटेल (१८) सर्व रा. वलनी (खाण), ता. सावनेर, प्रदीप गुलजारसिंग पटेल (३१), गोविंदसिंग मोतीसिंग बाबरे (२८), सुभाष शंकर इवनाते (२७), अरविंद लालचंद पटेल (२६) चौघेही रा. कळमेश्वर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फुलसिंग यांचा पाळीव कुत्रा प्रल्हाद यांच्या घरासमोर रोज घाण करायचा. त्यामुळे प्रल्हाद यांनी फुलसिंगला याबाबत विचारणा केली आणि हा प्रकार बंद करण्याची विनंती केली. त्यावर चिडलेल्या फुलसिंगने प्रल्हादसोब भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने फुलसिंगसह अन्य आरोपींनी प्रल्हाद, त्यांची पत्नी, मुलगा व साळ्याला मारहाण केली. त्यात प्रल्हाद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खापरखेडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४५२, ३२३, १४१, १४३, १४७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. या घटनेचा तपास पोलीस हवालदार कृष्णा जुनघरे करीत आहेत.