नागपूरात स्थापत्य अभियंते रस्त्यावर; पुन्हा पेपर घेण्याची मागणी 

By मंगेश व्यवहारे | Published: February 29, 2024 02:36 PM2024-02-29T14:36:45+5:302024-02-29T14:37:07+5:30

दा व जलसंधारण विभागाची परीक्षा तत्काळ रद्द करावी यासंदर्भात विद्यार्थ्यांनी हातात फलकं घेऊन निदर्शने केली

Civil Engineers agitation on Road in Nagpur; Demand to retake the paper | नागपूरात स्थापत्य अभियंते रस्त्यावर; पुन्हा पेपर घेण्याची मागणी 

नागपूरात स्थापत्य अभियंते रस्त्यावर; पुन्हा पेपर घेण्याची मागणी 

नागपूर : मृदा व जलसंधारण विभागाच्या ६७० जागेसाठी २० व २१ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील एआरएन असोसिएट्स ड्रीम लॅण्ड या सेंटरवर पेपर लीक झाल्याचा प्रकार घडला.

या प्रकरणी एका विद्यार्थ्याला पोलीसांनी अटकही केली होती. या पेपर लीकवरून परीक्षा बसलेले स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी संतप्त झाले आहे. पेपर लीकमुळे होतकरू मुलांचे नुकसान होवू नये म्हणून फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी संविधान चौकात आंदोलनावर बसले आहे. मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा तत्काळ रद्द करावी यासंदर्भात विद्यार्थ्यांनी हातात फलकं घेऊन निदर्शने केली. नागपूरसह विदर्भातून जवळपास ५० वर परीक्षार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Civil Engineers agitation on Road in Nagpur; Demand to retake the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.