मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:07 AM2024-06-13T11:07:20+5:302024-06-13T11:08:25+5:30

हेलन सांगतात, "आधी मी काठी घेऊन चालायचे....'

Helen did workout in Gym at the age of 85 trainer Yasmin Karachiwala shared video | मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगनाहेलन (Helen) सध्या चर्चेत आहेत. वयाच्या 85 व्या वर्षीही त्या जिममध्ये वर्कआऊट करत आहेत. सेलिब्रिटी जिम ट्रेनर यास्मिन कराचीवालाने व्हिडिओ शेअर करत हेलन यांचा उत्साह दाखवला आहे. या वयातही त्यांची ऊर्जा नक्कीच प्रेरणा देणारी आहे. 'मेहबूबा मेहबूबा' गाण्यावरील हेलन यांचा डान्स आजही अनेकजण कॉपी करतात. या डान्सस्टेप प्रमाणेच हेलनही चिरतरुण आहेत.

जिम ट्रेनर यास्मिन कराचीवालाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हेलन यांचे फिटनेस रुटीन जाणून घेत आहे. तसंच तिनेच हेलन यांना Pilates हा व्यायाम प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. या व्हिडिओत हेलन सांगतात, "आधी मी काठी घेऊन चालायचे. आता ती काठी कपाटात कुठेतरी ठेवली आहे. मला गुडघेदुखीचा त्रास होता. त्यासाटी मी इंजेक्शन घ्यायचे. आता तो त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. मी आता आपणहून चालू शकते कदाचित डान्सही करु शकेन. इंडस्ट्रीतील सर्व डान्सर्सना सांगेन तुम्ही आता जा कुठेतरी कारण मी परत येतीये. Pilates मुळे मला खूप उत्साही वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. नशेसाठी मला सिगारेट, दारुची गरज नाही. Pilates मुळेच मला HIGH वाटतंय."

हेलन या सलीम खान यांच्या पत्नी असून सलमान खानच्या सावत्र आई आहेत. सलीम खान सर्वांसोबत एकत्र राहतात. हेलन यांनी 70 ते 80 च्या दशकात अनेक गाजलेले सिनेमे केले आहेत. डान्समुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Web Title: Helen did workout in Gym at the age of 85 trainer Yasmin Karachiwala shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.