शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या बंधनात सर्कस चालविणे ही ‘सर्कसच’

By admin | Updated: November 14, 2015 03:23 IST

घोडे, श्वान, पोपट यांच्यासारख्या प्राण्यांना एखाद्या समजूतदार माणसासारखे प्रदर्शन करताना पाहणे कुणासाठीही रोमांचकच आहे.

पाळीव प्राण्यांच्या आधारानेच मनोरंजन : अस्तित्व सांभाळणेही कठीण नागपूर : घोडे, श्वान, पोपट यांच्यासारख्या प्राण्यांना एखाद्या समजूतदार माणसासारखे प्रदर्शन करताना पाहणे कुणासाठीही रोमांचकच आहे. लोकांना त्यांच्या सादरीकरणाचे व्यायामाचे आश्चर्यही वाटते. असा अनुभव केवळ सर्कसीतच घेता येणे शक्य आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने कमी होती त्यावेळी समाजाच्या मनोरंजनाच्या पारंपारिक साधनात सर्कस हे महत्वाचे माध्यम होते. एकेकाळी अतिशय लोकप्रिय असलेल्या सर्कसला मात्र सद्यस्थितीत स्वत:चे अस्तित्व सांभाळणेही कठीण झाले आहे. मनोरंजनाच्या आधुनिक साधनांनी सर्कसला अजिबात पिछाडीवर टाकले नाही. उलटपक्षी सर्कसचे नाव ऐकल्यावर आजही आबालवृद्ध आकर्षित होतात. पण कायद्याच्या बंधनामुळे सर्कस चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. कस्तूरचंद पार्कवर अमर सर्कस नागरिकांच्या सेवेत प्रारंभ करण्यासाठी तयार आहे. त्याची संपूर्ण तयारी आणि उभारणीही झाली आहे. आवागमन करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्कसीचा हा तंबू खुणावत आहे. लवकरच येथे संगीताची धून सजेल आणि प्रतिभावंत कलावंत आपल्या कौशल्याचे सादरीकरणही करतील. पण सर्कस मालकांना मात्र कायद्याच्या अनेक जाचक अटीतून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. सर्कसचे संचालक नीरज गाडगे म्हणाले, कायदेशीर बंधनामुळे सर्कसीचे प्रमुख आकर्षण असलेले हत्ती, वाघ, सिंहासारखे प्राणी सर्कसीतून बाद झाले आहे. सध्या सर्कसीत सात घोडे, विविध प्रजातींचे श्वान आणि सहा आफ्रिकी पोपट आहेत. हे प्राणी एखाद्या कसलेल्या कलावंतांसारखे त्यांचे कौशल्य सादर करतात. याशिवाय चार केनियन, तीन मंगोलियन आणि आठ मणिपुरी व नागालँडच्या कलावंतांसह जवळपास ४५ कलावंत सर्कसीत त्यांचे कौशल्य सादर करतात. गेल्या दीड दशकापासून सर्कसीत वाघ, अस्वल, बंदर आणि हत्ती यांना मनाई करण्यात आल्याने सर्कसीचे खरे आकर्षण हरविले आहे. पूर्वी या वन्यप्राण्यांची खूप चर्चा व्हायची आणि त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दीही व्हायची. आता काही पशुंच्या आधारावरच प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न तोकडा पडतो, त्याचा परिणाम नफ्यावरही होतो, असे गाडगे म्हणाले. (प्रतिनिधी)