कारचा सिनेस्टाईल पाठलाग, सुगंधित तंबाखू जप्त
By योगेश पांडे | Updated: November 10, 2023 16:18 IST2023-11-10T16:13:36+5:302023-11-10T16:18:22+5:30
आरोपींना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले

कारचा सिनेस्टाईल पाठलाग, सुगंधित तंबाखू जप्त
नागपूर : एका कारचा संशयावरून सिनेस्टाईल पाठलाग करून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
एका गाडीतून संशयास्पद वस्तूंची तस्करी करण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाकडून तसा तपास सुरू होता. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अय्यपा नगर येथे एमएच २६ एके १५९९ या क्रमांकाच्या गाडीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र कारचालकाने गाडी दामटली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला व कारला थांबविले. कारमध्ये असद खान उर्फ मजीद खान (३५, श्याम लॉनजवळ) व शोएब स्माईल शेख (३५, कुदरत प्लाझा अपार्टमेंट, जाफरनगर) हे होते. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला.
पोलिसांनी एकूण ६.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मुकूंद ठाकरे, देवकाते, खोरडे, पांडे, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जादुस, अनिल बोटरे, मनिष रामटेके, प्रमोद देशभ्रतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.