औषध घेतल्यावर प्रकृती बिघडल्याने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 22:09 IST2022-08-26T22:09:26+5:302022-08-26T22:09:49+5:30

Nagpur News औषध सेवन केल्यानंतर प्रकृती खालावल्याने एका बालकाचा मृत्यू झाला.

Child's death due to health deterioration after taking medicine | औषध घेतल्यावर प्रकृती बिघडल्याने मुलाचा मृत्यू

औषध घेतल्यावर प्रकृती बिघडल्याने मुलाचा मृत्यू

नागपूर : औषध सेवन केल्यानंतर प्रकृती खालावल्याने एका बालकाचा मृत्यू झाला. १२ वर्षीय ग्रंथ राजेश पटेल असे मृताचे नाव असून, तो सातवीचा विद्यार्थी होता.

ग्रंथला अभ्यासात अडचणी येत असल्याचे शिक्षकांनी त्याच्या पालकांना सांगितले होते. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी त्याला सोमलवाडा येथील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी कुटुंबातील सदस्यांना जेवण झाल्यावर त्यांनी सांगितलेली अर्धी गोळी देण्यास सांगितले. जेवण आटोपल्यानंतर नातेवाईकांनी मुलाला अर्धी गोळी दिली. काही काळानंतर मुलाची तब्येत अचानक बिघडली. नातेवाइकांनी त्यांना धंतोली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी त्याचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूने पालकांना मोठा धक्का बसला आहे. गणेश पेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Child's death due to health deterioration after taking medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू