शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा चलनात; पाटणसावंगी येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:40 IST

दुकानदारांची फसवणूक

अनंता पडाळ

पाटणसावंगी (नागपूर) : खऱ्या नाेटांसारख्या नाेटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. त्यावर ‘चिल्ड्रेन बॅंक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नाेटांचा आकार खऱ्या नाेटांच्या तुलनेत माेठा असायचा. काहींनी या ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील दुकानदारांना नकळत देऊन चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यातून त्या दुकानदाराची फसवणूक झाली आहे.

नागपूर-भाेपाळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेले पाटणसावंगी हे सावनेर तालुक्यातील माेठे व महत्त्वाचे गाव आहे. या गावात हाॅटेल, दुकाने, पानटपरी यासह व्यापारी प्रतिष्ठानांची संख्याही अधिक आहे. पाटणसावंगी येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असून, आठवड्यातून तीन दिवस छाेटा गुजरी बाजारही भरताे. मागील काही दिवसात येथील दुकानदारांना काहींनी ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा देऊन साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

आपल्याला २० रुपये, ५० रुपये आणि २०० रुपयांची प्रत्येकी एक नाेट याप्रमाणे ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या तीन नाेटा प्राप्त झाल्याची माहिती जनरल स्टाेअर्स मालक विनाेद वासाडे व पानटपरी चालक सुनील पांडे यांनी दिली. आठवडी बाजारातील काही भाजीपाला विक्रेत्यांना या ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा प्राप्त झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली असून, नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.

रात्रीची वेळ आणि गर्दीचा फायदा

‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा नेमक्या कुणी दिल्या, हे आठवत नसल्याचे दुकानदार सांगतात. या नाेटा घेऊन येणारे रात्रीच्या वेळी आणि दुकानात गर्दी असताना येतात. काही साहित्य खरेदी करतात. दुकानात इतर ग्राहक असल्याने तसेच मनुष्यबळ कमी असल्याने आपण त्या नाेटा निरखून बघितल्या नाही. शिवाय, त्या दिसायला हुबेहूब ओरिजिनल नाेटांसारख्या असल्याने आपण स्वीकारल्या. संबंधिताला त्याने खरेदी केलेल्या साहित्याची किंमत कमी करून उर्वरित रक्कम दिल्याचेही सुनील पांडे यांच्यासह इतर दुकानदारांनी सांगितले.

नाेटांमधील फरक

मूळ आणि ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटांचा आकार, चिन्ह, माहिती आणि रंग जवळपास सारखा आहे. त्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेऐवजी भारतीय चिल्ड्रेन बॅंक, भारतीय मनाेरंजन बॅंक, पचास रुपयेऐवजी पचास कूपन असा उल्लेख करण्यात आला आहे. या नाेटा पहिल्या बाजूवरून थाेड्याफार ओळखायला येतात. मात्र, दुसऱ्या बाजूवरून ओळखायला थाेडा वेळ लागताे. त्यामुळे संबंधित व्यक्ती या नाेटा दुकानदारांना देताना सहसा दुसरी बाजू वर करून देतात. त्या दाेन्ही नाेटांच्या पेपरचा स्पर्श जवळपास सारखा असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

या नाेटांवर बंदी घालावी

ज्या दुकानदारांना ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा प्राप्त झाल्या, त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केलेली नाही. असे प्रकार वाढीस लागण्याची तसेच त्यातून दुकानदारांसह इतरांची फसवणूक हाेण्याची शक्यता असल्याने ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा छापण्यावर बंदी घालावी, अशी माहिती दुकानदारांसह काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

रात्रीच्यावेळी दुकानात गर्दी असल्यास काही ग्राहक चिल्ड्रेन बॅंकेच्या नाेटा देऊन साहित्य खरेदी करतात. नाेटांचा रंग, आकार आणि त्यावरील विविध बाबींचा उल्लेख जवळपास सारखा असल्याने त्या नाेटा आपल्याला ओळखता आल्या नाही.

- सुनील पांडे, दुकानदार, पाटणसावंगी, ता. सावनेर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीMONEYपैसाnagpurनागपूर