वीजेच्या खांबाला चिपकल्याने बालकाचा मृत्यू;खेळत असताना घडली घटना
By दयानंद पाईकराव | Updated: April 10, 2024 17:26 IST2024-04-10T17:25:46+5:302024-04-10T17:26:18+5:30
कटलेल्या वायरमुळे खांबात आला करंट.

वीजेच्या खांबाला चिपकल्याने बालकाचा मृत्यू;खेळत असताना घडली घटना
दयानंद पाईकराव , नागपूर : शेजारच्या मुलांसोबत खेळत असताना विद्युत प्रवाह असलेल्या खांबाला चिपकल्याने एका ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्यांतर्गत विजयनगरात मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
कुंदन विजय शाहु (९, रा. प्लॉट नं. ११३, विजयनगर, कळमना) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तो इयत्ता चौथीत शिकतो. त्याच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान बहिण आहे. त्याचे आईवडिल मजुरी करतात.
घटनेच्या वेळी कुंदन आपल्या घराशेजारील तीन-चार मुलांसोबत खेळत होता. दरम्यान वायर कटल्यामुळे विद्युत प्रवाह असलेल्या सावरकर ले आऊट रिकाम्या प्लॉट समोरील खांब क्रमांक १३७ ला कुंदन चिपकला. तो खांबाला चिपकल्याचे पाहून शेजाºयांनी धाव घेतली. त्याला काठीच्या साह्याने खांबापासून वेगळे केले. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून कळमना ठाण्याचे उपनिरीक्षक ्नरतन उंबरकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.