मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसह दीक्षाभूमीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 20:04 IST2022-12-29T20:03:08+5:302022-12-29T20:04:06+5:30
Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दोघांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसह दीक्षाभूमीला भेट
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दोघांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. दीक्षाभूमी ही पवित्र भूमी असून पर्यटन क्षेत्रासोबतच तीर्थक्षेत्राचाही ‘अ’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी गोवारी शहीद स्मारकाला आदरांजली
दोन्ही नेत्यांनी त्यानंतर आदिवासी गोवारी शहीद स्मारक येथे भेट दिली. स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे, उपाध्यक्ष चिंतामण वाघाडे, सचिव शेखर लसुनते, कैलास राऊत, राजेश नेवारे, सूरज मनोटे याप्रसंगी उपस्थित होते.