शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लेआऊट नियमित करण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना

By admin | Updated: July 11, 2014 01:16 IST

शहरातील अनधिकृत लेआऊ ट नियमित करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे नागपुरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून याचे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्यानाच आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे

नागपूर: शहरातील अनधिकृत लेआऊ ट नियमित करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे नागपुरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून याचे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्र्यानाच आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले. जाहिराती देऊन या निर्णयाचे श्रेय घेतल्याबद्दल मोघे यांनी भाजपवर त्यांचे नाव न घेता टीका केली.शहरातील अनधिकृत लेआट्सला नियमित करण्याचा निर्णय झाला. भाजप नगरसेवकांनी या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मोघे यांनी खुलासा करताना ज्याच्या कामाचे श्रेय त्यानेच घ्यावे असा टोला हाणला. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून तो गेल्याच वर्षी घेण्यात आला होता. त्याचे श्रेय त्यांनाच आहे, असे मोघे म्हणाले.नागपूर शहरात विविध भागात विविध कामांसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र या जागेवर एकूण १९११ ले-आऊट्स सध्या अस्तित्वात आहेत. त्यावर लोकांनी पक्की घरे बांधली. मात्र जागा आरक्षित असल्याने महापालिका किंवा सुधार प्रन्यास तेथे विकास कामे करू शकत नव्हती. त्यामुळे जागेचे आरक्षण रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतरही पक्षांकडून वेळोवेळी केली. याची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये ले-आउट्स नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. हरित क्षेत्रातील भूखंडधारकांचे विकास शुल्क दुप्पट करून व सार्वजनिक उपयोगासाठी राखीव जागांवरील आरक्षण वगळून ते नियमित करण्यासाठी नगर रचना विभागाचे उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने सर्वेक्षण करून ५० टक्के पेक्षा जास्त भागात बांधकाम असलेले ले आऊ ट नियमिती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दक्षिण,पूर्व, दक्षिण पश्चिम नागपुरातील सरासरी तीन हजार नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)