शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:52 IST

भारताचे सरन्यायाधीश गवई हे एका कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगताना भावुक झाले.

CJI BR Gavai: भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे एका कार्यक्रमात भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि त्यांच्या पालकांच्या संघर्षांबद्दल सांगत होते. यादरम्यान त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांचा आवाज जड झाला. मला लहानपणापासूनच वास्तुतज्ज्ञ व्हायचे होते, पण माझ्या वडिलांचे स्वप्न वेगळे होते, असं सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. वडिलांच्या आठवणी सांगताना भूषण गवई यांना यांना अश्रू अनावर झाले.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे त्यांच्या आयुष्याशी संबंधित वैयक्तिक अनुभव सांगत भावनिक झाले. नागपूर जिल्हा न्यायालय बार असोसिएशनने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांच्या पालकांच्या संघर्षांचा आणि त्यांच्या वडिलांच्या आकांक्षांनी त्यांच्या जीवनाची दिशा कशी बदलली हे सांगितले. मला आर्किटेक्ट व्हायचे होते, पण वडिलांना मला वकील बनवायचे होते, अशी आठवण सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. हे सांगताना सरन्यायाधीश भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

"माझ्या वडिलांना वकील व्हायचे होते, पण स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. माझ्या वडिलांनी स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. आम्ही एका संयुक्त कुटुंबात राहत होतो आणि सर्व जबाबदारी माझ्या आई आणि काकूंवर होती. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वास्तुतज्ज्ञ होण्याचे स्वप्न सोडले," असं सरन्यायाधीश गवई म्हणाले.

"जेव्हा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं की जर तू वकील राहिलात तर  फक्त पैशाच्या मागे धावशील, पण जर तू न्यायाधीश झालास तर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करशील. समाजाचे भले कराल. माझे वडील नेहमी म्हणायचे की माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी राहणार नाही. २०१५ मध्ये आम्ही त्यांला गमावले. आज त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते. पण मला आनंद आहे की माझी आई अजूनही आमच्यात आहे," असेही सरन्यायाधीशांनी म्हटलं.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय