पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याला दोन लाखांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:45 IST2020-06-18T00:43:56+5:302020-06-18T00:45:33+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची एका महिलने दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार केली असता, पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याला दोन लाखांनी फसविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची एका महिलने दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार केली असता, पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
देबडवार हे सदर हद्दीतील आनंदनगर येथील मेघदूत या बंगल्यात राहतात. त्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी संध्या जैन नावाच्या एका महिलेने फोनवरून संपर्क केला. तिने स्वत:ला आयसीआयसीआय लाईफ इन्श्युरन्समधून बोलत असल्याचे सांगत तुमचे पॉलिसीचे हप्ते भरायचे आहे, असे देबडवार यांना सांगितले. तिने देबडवार यांना आपला बँकेचा खाते क्रमांकसुद्धा दिला. त्यावर देबडवार यांनी दोन लाख रुपये जमा केले. ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते लाईफ इन्शुरन्सशी संबंधित नसल्याचे देबडवार यांच्या १५ मे रोजी लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याप्रकरणी देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली.