नागपुरात विदेशी सफरीच्या नावाखाली ठगविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:33 IST2020-06-13T22:30:49+5:302020-06-13T22:33:34+5:30
विदेशी सफर घडवून आणतो म्हणून चौघांनी एका व्यक्तीला ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. सात महिने झाले तरी सफर घडवून आणली नाही किंवा पैसे परत केले नाही त्यामुळे पीडित व्यक्तीने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

नागपुरात विदेशी सफरीच्या नावाखाली ठगविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी सफर घडवून आणतो म्हणून चौघांनी एका व्यक्तीला ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. सात महिने झाले तरी सफर घडवून आणली नाही किंवा पैसे परत केले नाही त्यामुळे पीडित व्यक्तीने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. प्रीतम बोबडे (रा. कुही मांडळ), सौरभ सिंग, जय सिंग (रा. मंगळवारी बाजार) आणि समय (रा. महाल) अशी आरोपींची नावे आहेत.
रामराव गणपती पखाले (वय ६७) हे आदिवासी कॉलनी भामटी येथे राहतात. उपरोक्त आरोपींनी त्यांना ५५ हजार रुपयात सिंगापूर, मलेशियाची सफर घडवून आणतो, अशी थाप मारून त्यांच्याकडून १ सप्टेंबर २०१८ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत रक्कम घेतली. मात्र ५५ हजार रुपये घेतल्यानंतर त्यांना कोणतीही सफर घडवून आणली नाही किंवा त्यांची रक्कमही त्यांना परत केली नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे पखाले यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. इमामवाडा पोलिसांनी चौकशीअंती उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यांचा शोध घेतला जात आहे.