शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

फेसबुक मैत्रिणीने फसवले; लंडनहून पुस्तके पाठवते सांगून घातला दीड लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:17 IST

विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवते, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवते, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुण २५ वर्षांचा असून पोलिसांच्या माहितीनुसार, तो मेडिकलचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून लंडनच्या इसाबेला लुसी नामक एका तरुणीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर हे दोघे ऑनलाईन संपर्कात होते. दोघांनीही एकमेकांबाबतची कौटुंबिक, व्यवसाय आणि शैक्षणिक माहिती एकमेकांना आदानप्रदान केली. लुसीने पीडित विद्यार्थ्याला आपला शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके विकण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. आमच्याकडे अत्यंत स्वस्त किमतीत वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके मिळत असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे पीडित तरुणाने तिला आपल्यासाठी काही चांगली पुस्तके पाठविण्यास सांगितले. २९ जूनला लुसीने फोन करून पीडित तरुणाला त्याची पुस्तके दिल्लीतील कस्टम अधिकारी प्रिया शर्मा हिच्या माध्यमातून पाठविल्याचे सांगितले.

ही पुस्तके मिळविण्यासाठी कथित कस्टम अधिकारी प्रिया शर्माचा मोबाईल नंबरही पीडित तरुणाच्या मोबाईलवर पाठवला. त्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणाने प्रिया शर्मासोबत संपर्क साधला. शर्माने पीडित विद्यार्थ्याला दिल्लीतील आसिफ खान नामक व्यक्तीचा बँक खात्याचा नंबर दिला. हे आमचे कस्टम विभागप्रमुख आहेत, असे सांगून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर पुस्तके मिळतील, असे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्याने आसिफ खानच्या खात्यात इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून १ लाख ४३ हजार रुपये जमा केले. २९ जूनच्या सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा व्यवहार पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्याने पुस्तकांची डिलिव्हरी मागितली असता आरोपी टाळाटाळ करू लागले. ते असंबंद्ध माहिती देत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्याला संशय आला. त्यामुळे त्याने आरोपींना तातडीने पुस्तक द्या अन्यथा पोलिसांकडे तक्रार करतो, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित विद्यार्थ्याने सायबर शाखेत धाव घेतली. तेथून चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी सोमवारी अजनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.लुसीनेच पाठविली होती फ्रेंड रिक्वेस्टया प्रकरणात कथित प्रिया शर्मा आणि आसिफ खानचे नाव आले असले तरी मुख्य सूत्रधार इसाबेला लुसी हीच असावी, असा संशय आहे. तिनेच नऊ महिन्यापूर्वी विद्यार्थ्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्याच्य संबंधीची आर्थिक, कौटुंबिक माहिती घेतल्यानंतर त्याला कशा पद्धतीने फसवता येईल, याबाबतचा कट लुसीनेच रचला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस कथित लुसी आणि तिच्या साथीदारांचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम