शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

चतुर्वेदींचे शक्तिप्रदर्शन : काँग्रेस वर्तुळात चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:32 PM

काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत्तेमवार विरोधी गट ताकदीने सक्रिय होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस पक्षातून निष्काषित तरीही

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत्तेमवार विरोधी गट ताकदीने सक्रिय होण्याचे संकेत आहेत.चतुर्वेदी यांच्या स्वागतासाठी सिव्हील लाईन्सच्या करोडपती गल्लीतील 'महाविद्या' बंगल्यावर बुधवारी नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रदेश सचिव प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, नगरसेवक कमलेश चौधरी, जुल्फिकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, किशोर जिचकार, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, आशा उईके, शाहिदा बेगम, जिशान मुमताज, प्रणीता शहाणे, मनोज गावंडे, स्नेहा निकोसे, सुभाष खोडे, इब्राहिम चुडिवाले, कुसुम बावनकर, परमेश्वर राऊत, श्रीकांत कैकाडे, राजू महाजन, राजेश जरगर, नीरज चौबे, नियामत ताजी, अविनाश मैनानी, चंदू पांडे आदींनी हजेरी लावली. ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी यांनीही भेट घेतली.काँग्रेसने निष्कासित केल्यानंतरही समर्थकामध्ये जोश होता. चतुर्वेदींच्या घरवापसीसाठी पुन्हा एकदा दिल्लीत फिल्डिंग लावण्याचे संकेतही यावेळी समर्थकांनी दिले.

टॅग्स :Satish Chaturvediसतीश चतुर्वेदीcongressकाँग्रेस