नागपुरात विधि शाखेच्या विद्यार्थ्यावर पाठलाग करून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:53 IST2018-11-28T23:53:12+5:302018-11-28T23:53:56+5:30
कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली.

नागपुरात विधि शाखेच्या विद्यार्थ्यावर पाठलाग करून हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कट लागल्याच्या नावावर ट्रिपल सीट बाईक स्वार युवकांनी एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर पोलीस ठाणे हद्दीअंतर्गत जाफरनगर चौकात घडली.
पोलीस सूत्रानुसार विधि शाखेचा विद्यार्थी असलेला २१ वर्षीय रोहन रोहीत देव हा मंगळवारी रात्री ८.३० वाजता आपल्या मित्रांसोबत जाफरनगर येथे आला होता. तो मित्रांना त्यांच्या घरी सोडून परत जात होता. जाफरनगर चौकातून एका बाईकवर ट्रिपल सीट युवक जात होते. त्यांनी रोहनवर कट मारण्याचा आरोप केला. रोहनने मात्र आपण कुणालाही कट मारली नसल्याचे सांगितले. यावर ते वाद करू लागले. रोहन वाद वाढवण्याऐवजी ‘सॉरी’ म्हणून पुढे निघाला. यानंतरही बाईकस्वार शांत झाले नाही. त्यांनी पाठलाग करून रोहनला अडविले आणि त्याला मारहाण केली.
रोहनने या घटनेची सूचना पोलिसांना दिली. मानकापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय राऊत, हवालदार प्रमोद दिगोरे, राजेश कोकाटे लगेच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला. दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी विनाकारण मारहाण केल्याची बाब कबुल केली.