हावडा-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:22+5:302020-12-04T04:25:22+5:30
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी सुपरफास्ट रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा या गाडीच्या ...

हावडा-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी सुपरफास्ट रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा या गाडीच्या वेळेत ५ आणि ७ डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडावरून ५ डिसेंबर पासून रात्री ९.१० वाजता सुटेल. ही गाडी खडगपूर, टाटानगर, चक्रधरपुर, राऊरकेला, झारसुगुडा, रायगढ, खिरसया, सिक्त, चांपा, बिलासपूर, भाटपारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया, तुमसर रोड, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नासिक रोड, कल्याण आणि दादर येथे थांबणार आहे.
.........