शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचे मानसिक संतुलन ढासळले, मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 14:56 IST

नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा पुतळा जाळून निषेध

कोराडी (नागपूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पुन्हा केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी पटोलेंच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला.

पटोले यांनी पंतप्रधानांच्या पत्नीचा संदर्भ देऊन केलेल्या विधानामुळे देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. महिला हा अपमान कदापि सहन करणार नाही. नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, या शब्दांत बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर टीका केली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केले जाणार आहे. तसेच आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेही तक्रार करू, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते नाना पटोले? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असं म्हटलं होतं. त्यानंतर नाना पटोले यांनी मी संबंधित विभागातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोलत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. पटोलेंच्या एका विधानानं वादळ निर्माण झालेलं असतानाच त्यांनी काल इगतपुरीमध्ये आणखी वादग्रस्त विधान केलं. 

'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असं विधान नाना पटोले यांनी काल केलं. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. नाना पटोलेंच्या विधानानंतर राज्यभर भाजपकडून जोरदार निदर्शनं केली जात आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाagitationआंदोलन