शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक नियुक्तीच्या बुद्धिमत्ता चाचणीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:50 IST

शिक्षक नियुक्तीसाठी लागू अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याअनुषंगाने ‘एमईपीएस’ म्हणजे,

हायकोर्टात याचिका : एमईपीएस नियमातील दुरुस्तीवरही आक्षेपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक नियुक्तीसाठी लागू अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याअनुषंगाने ‘एमईपीएस’ म्हणजे, महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियम-१९८१ यात करण्यात येत असलेली दुरुस्ती याविरुद्ध बुलडाणा जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ही याचिका शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणीसाठी येणार आहे.राज्य शासनाने शिक्षक भरतीमधील गैरप्रकार टाळण्यासाठी व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात २३ जून २०१७ रोजी जीआर जारी करण्यात आला आहे. या ‘जीआर’नुसार ‘एमईपीएस’ नियमांत दुरुस्ती केली जाणार आहे. भविष्यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली नसल्याचे आढळल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांना व शाळांना अनुदान देण्यात येणार नाही. याशिवाय ‘सरल’ या संगणकीय प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थीसंख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करण्यात येणार आहे. नवीन भरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. रिक्त पदांची विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदुनामावलीनुसार माहिती जाहीर करण्यासाठी ‘पवित्र’ ही संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीवर शिक्षक भरतीची जाहीरात प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासह भरतीसंदर्भातील अन्य विविध मुद्दे ‘जीआर’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. रवींद्र खापरे व अ‍ॅड. राघव कविमंडन कामकाज पाहतील.जनहित याचिका निकालीराज्य शासनाने हा जीआर जारी केल्यामुळे उच्च न्यायालयाने शिक्षक नियुक्तीमधील गैरप्रकारावरील जनहित याचिका निकाली काढली आहे. ही याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल केली होती. याप्रकरणात अ‍ॅड. आनंद परचुरे न्यायालय मित्र होते. भावी पिढ्यांचे भविष्य घडविणारा हा निर्णय शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला आहे.