शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची केस लढणाऱ्या वकिलावर चाकूहल्ला

By admin | Updated: January 10, 2017 02:01 IST

पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणाऱ्या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला.

वकिलाची पत्नीही जखमी : हुडकेश्वरमध्ये दहशत नागपूर : पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणाऱ्या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला. जखमी पत्नीच्या मदतीला धावलेल्या वकिलाच्या पत्नीवरही आरोपीने चाकूचा वार केला. या हल्ल्यात वकील आणि त्यांची पत्नी जबर जखमी झाले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. संजय रामभाऊ पिंगळे (वय २९) आणि अश्विनी संजय पिंगळे अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. आरोपी सूरज विनायक केळझरकर (वय २३) उमरेडचा (जि. नागपूर) रहिवासी आहे. त्याचे श्वेता नामक तरुणीसोबत लग्न झाले होते. व्यक्तिगत कारणामुळे पटेनासे झाल्याने त्याची पत्नी श्वेता हिने सूरजच्या विरोधात काही दिवसांपूर्वी पोलिसात आणि कोर्टात धाव घेतली. त्यांचे प्रकरण कोर्टात नेण्यासाठी वकील संजय पिंगळे यांनी मदत केल्याची माहिती सूरजला मिळाली. त्यामुळे पिंगळे यांनी तिला मदत करू नये, अशी सूरजची भावना होती. त्याला दाद न मिळाल्यामुळे सूरज संतापला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास तो आपल्या एका साथीदारासह हुडकेश्वरमधील चक्रपाणीनगरात राहणारे वकील संजय पिंगळे यांच्या घरात शिरला. ‘तुम्ही श्वेताला मदत का करता’ , अशी त्याने विचारणा केली. आपला व्यवसाय असल्यामुळे आपण तिची केस लढतो. आपण नाही लढलो तर ती दुसऱ्या कुणा वकिलाकडे जाईल, असेही पिंगळेने आरोपीच्या लक्षात आणून दिले. मात्र, ते समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या सूरजने पिंगळेशी वाद घातला आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर चाकूचे वार केले.पिंगळे यांची पत्नी अश्विनी मदतीला धावल्या असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केला. (प्रतिनिधी) आरोपींची शोधाशोध जखमी पिंगळे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. वकिलावर हल्ला झाल्याची माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी धावपळ केली. पिंगळे यांच्या तक्रारीवरून आरोपी सूरज केळझरकर आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्यरात्री आरोपीच्या शोधासाठी त्याचे गावही गाठले. मात्र, आरोपी मिळाले नाही. वृत्त लिहिस्तोवर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचे नाव स्पष्ट झाले नव्हते.