मनपा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:02 IST2020-07-21T21:59:47+5:302020-07-21T22:02:21+5:30
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. मंगळवारी पुन्हा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने विभागातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली.

मनपा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. मंगळवारी पुन्हा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने विभागातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली.
केंद्र अधिकारी यांना दोन दिवसापूर्वी ताप होता. सोमवारी त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना मेडिकल रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. केंद्र अधिकाऱ्याचा मुलगा व सून नुकतेच मुंबईवरून नागपुरात आले. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी करणार
अग्निशमन विभागाच्या सिव्हिल लाईन मुख्यालयातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले. खबरदारी म्हणून विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची बुधवारी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.