मध्य रेल्वे वर्षभरात वाचविणार १.४ कोटी युनिट वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:29 IST2017-12-03T00:28:17+5:302017-12-03T00:29:38+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला.

मध्य रेल्वे वर्षभरात वाचविणार १.४ कोटी युनिट वीज
ऑनलाईन लोकमत
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह सर्व पाच विभागात व कारखान्यात चालू आर्थिक वर्षात जुने विजेचे बल्ब आणि पंखे यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब, नवे पंखे आणि एसी लावण्यासाठी शुक्रवारी करार करण्यात आला.
केंद्र शासनाचा उपक्रम एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लि. (ईईएसएल) आणि मध्य रेल्वेमध्ये हा करार करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या करारानुसार ईईएसएल सुरुवातीला १०० टक्के म्हणजे ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मध्य रेल्वे ही रक्कम ईईएसएलला विजेच्या बिलात झालेल्या बचतीतून मिळालेल्या रकमेतून तिमाही किश्तीतून परत करणार आहे. पाच वर्षाच्या या करारांतर्गत ईईएसएल गरज भासल्यास खराब झालेली इलेक्ट्रीक फिटिंग आणि उपकरण बदलेल. असे केल्यास वर्षभरात १.४ कोटी युनिट विजेची बचत होण्याचा अंदाज आहे. यामुळे रेल्वेचे वर्षभरात १३.१४ कोटी रुपये वाचतील. या करारावर स्वाक्षरी करताना रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.