मध्य रेल्वेच्या गोदामाला आग; केबलचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 21:26 IST2022-10-25T21:25:46+5:302022-10-25T21:26:09+5:30
Nagpur News अजनी परिसरातील रेल्वे क्वॉर्टर लगत असलेल्या मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन, इंजिनिअर, सिग्नल विभागाच्या केबल गोदामाला मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत केबलचे मोठे नुकसान झाले.

मध्य रेल्वेच्या गोदामाला आग; केबलचे मोठे नुकसान
नागपूर : अजनी परिसरातील रेल्वे क्वॉर्टर लगत असलेल्या मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन, इंजिनिअर, सिग्नल विभागाच्या केबल गोदामाला मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत केबलचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांनी तासभरात ही आग आटोक्यात आणली.
केबल गोदामाला आग लागल्याने आगीचे लोळ दूरवरून दिसत होते. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही वेळात ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी दिली.