शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' साजरा; रेल्वेस्थानक ऐतिहासिक कोच, इंजिनवर रोषणाई

By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2023 22:59 IST

विविध उपक्रमांचेही आयोजन, आंतरराष्ट्रीय परिषदेकडून निश्चित करण्यात आल्यापासून १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतीय रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून आज १८ एप्रिलला 'विश्व धरोहर दिवस' साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेकडून निश्चित करण्यात आल्यापासून १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतीय रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार, रेल्वेची वास्तू आणि ऐतिहासिक कोच तसेच वाफेवर चालणाऱ्या इंजिनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी करण्यात आलेल्या विविध योजनांना उजाळा देण्याच्या उद्देशाने हा दिवस १९८२ ला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, नागपूर विभागातील नागपूरसह चार ठिकाणांना मानांकित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.

नागपूर रेल्वेस्थानक : ग्रेट इंडियन पेनिनसुला कंपनीकडून या ऐतिहासिक वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. १५ जानेवारी १९२५ ला तत्कालिन महामहिम सर फ्रँक जी. स्ली. (मध्य प्रांताचे गव्हर्नर) यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन केले होते. सोनेरी (साओनेर) दगड आणि रेतीचा वापर करून ही आकर्षक तसेच भव्य इमारत उभारण्यात आली होती.

स्टीम लोको 'बुलंद'१९५४ ला मेसर्स स्मिथ विल्सन एन्ड कंपनी लिमिटेड इंग्लंडने नेरोगॅज स्टीम (वाफेवर चालणारे) इंजन -५ झेडपी 'बुलंद'ची नागपूर रेल्वेसाठी निर्मिती केली होती. हे इंजिन पुलगांव - आर्वी (जि. वर्धा) रेल्वे मार्गावर १९८६ पर्यंत कार्यरत होते. नंतर डिझेल इंजिनचा वापर सुरू झाल्याने हे अजनी यार्डात स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१२ ला नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात पश्चिमेला हे स्थापित (प्रदर्शन) करण्यात आले. रेल्वे स्थानकवरचे हे एक आकर्षण आहे.

वर्धा रेल्वेस्थानकएनजी कोच सीआर ९४० : हा नॅरोगेज कोच १९६१ मध्ये तयार करण्यात आला होता. जीईपीआरच्या नियंत्रणात असलेला हा कोच विदर्भातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या पुलगांव - आर्वी रेल्वे मार्गावर तो १९८८ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत होता. त्यानंतर तो बंद करण्यात आला. हा ऐतिहासिक कोच गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२१ ला वर्धा रेल्वे स्थानकावर स्थापित करण्यात आला.

चंद्रपूर स्थानकावर 'विराट'चे प्रदर्शन

हिरदागड रेल्वेस्थानकावर एक नॅरोगेज स्टीम इंजिन बंद अवस्थेत पडून होते. १९७३ ला खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बालाजी मायनिंग कंपनीने हे इंजिन संचालित केले. मात्र, काही दिवसांनंतर त्याचे संचालन बंद केले. नंतर वेकोलिने ते उधार (उसनवार तत्त्वावर) घेतले. त्यानंतर हे वाफेवर चालणारे इंजिन चंद्रपूर स्थानकावर स्थापित करण्यात आले. ते नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.