ट्रॅकमॅनकडून दोन हजारांची लाच, रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयकडून कारवाई

By योगेश पांडे | Updated: April 7, 2026 20:29 IST2026-04-07T20:28:09+5:302026-04-07T20:29:10+5:30

Nagpur : ट्रॅकमॅनकडून दोन हजारांची लाच घेताना रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयकडून रंगेहाथ कारवाई करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CBI takes action against railway accountant for accepting bribe of Rs 2,000 from trackman | ट्रॅकमॅनकडून दोन हजारांची लाच, रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयकडून कारवाई

CBI takes action against railway accountant for accepting bribe of Rs 2,000 from trackman

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
ट्रॅकमॅनकडून दोन हजारांची लाच घेताना रेल्वेच्या अकाऊन्टंटविरोधात सीबीआयकडून रंगेहाथ कारवाई करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अकाऊन्टंट मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय वित्त व्यवस्थापक कार्यालयात कार्यरत आहे. सीबीआय नागपूरच्या पथकाने ही कारवाई केली.

संजीत कुमार असे आरोपी अकाऊन्टंटचे नाव आहे. तक्रारदार ट्रॅकमन अकोला जिल्ह्यात कार्यरत आहे. एमएससीपी अंतर्गत त्याचा ५८ हजार ७०० रुपयांचा एरिअर्स थकीत होता. त्याबाबतचा प्रस्ताव मुर्तीजापूर कार्यालयातून भुसावळला पाठविण्यात आला होता. तक्रारदाराने १३ मार्च रोजी संबंधित कामासाठी संजीत कुमारची भेट घेतली. परंतु संजीतने त्यांना फाईलवर प्रक्रिया करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर प्रस्ताव तेथेच धूळ खात पडला राहील अशी धमकीदेखील दिली. आपल्याच हक्काच्या पैशांसाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने ट्रॅकमॅनने ६ एप्रिल रोजी थेट सीबीआय कार्यालयाला पत्र लिहून तक्रार केली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. संजीत कुमारने तक्रारदाराला दोन हजारांत काम करून देईल असे सांगितले. सीबीआयच्या पथकाने कारवाई करत संजीत कुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून त्याने आणखी किती कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे पैसे उकळले याचा तपास सुरू आहे.

 

Web Title : ट्रैकमैन से रिश्वत लेते रेलवे अकाउंटेंट गिरफ्तार; सीबीआई की कार्रवाई

Web Summary : नागपुर में सीबीआई ने एक रेलवे अकाउंटेंट को ट्रैकमैन से बकाया राशि के प्रोसेसिंग के लिए ₹2,000 की रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा। आरोपी संजीत कुमार ने पैसे की मांग की थी, जिसके बाद उसकी गिरफ्तारी हुई और अन्य संभावित उगाही की जांच जारी है।

Web Title : Railway Accountant Arrested for Accepting Bribe from Trackman; CBI Action

Web Summary : A railway accountant was caught red-handed by the CBI in Nagpur for accepting a bribe of ₹2,000 from a trackman for processing his arrears. The accountant, Sanjeet Kumar, demanded money to process the trackman's pending dues, leading to his arrest and investigation into other potential extortions.