शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
3
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
4
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
5
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
6
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
7
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
8
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
9
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
10
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
11
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
12
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
13
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
14
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
15
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
16
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
17
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
18
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
19
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
20
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : पाेलिसांनी खापा नजीकच्या नंदापूर (ता. सावनेर) शिवारात गुरुवारी (दि. ४) रात्केरी ११ वाजताच्या सुमारास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : पाेलिसांनी खापा नजीकच्या नंदापूर (ता. सावनेर) शिवारात गुरुवारी (दि. ४) रात्केरी ११ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात पाेलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण १५ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आशिष बबन निकोसे (३५, रा. करजघाट, ता. सावनेर) ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. खापा (ता. सावनेर) पाेलीस गस्तीवर असताना त्यांना नंदापूर शिवारातून रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी करीत एमएच-३६/एफ-२८४५ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली.

ही रेती विनाराॅयल्टी वाहून नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी रेतीसह ट्रक जप्त केला आणि ट्रकचालक आशिष निकाेसे यास चाैकशीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये १५ लाख रुपयांचा ट्रक आणि १२ हजार रुपयांची रेती असा एकूण १५ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. या प्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.