रेती वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:35+5:302020-12-30T04:11:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : पाेलिसांनी कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा)-गुमथळा मार्गावर कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक ...

रेती वाहतुकीचा ट्रक पकडला
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : पाेलिसांनी कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा)-गुमथळा मार्गावर कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. २७) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राहुल हरिश्चंद्र शहारे व महेंद्र आनंदराव ढाेले अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना साेनेगाव (राजा) परिसरातून रेतीची वाहतूक केेली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी लगेच साेनेगाव (राजा)-गुमथळा मार्गाची पाहणी केली. त्यात त्यांना एमएच-३१/सीक्यू-६६६९ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. त्यांनी हा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये रेती असल्याचे आढळून येताच कागदपत्रांची कसून तपासणी केली.
ती रेती विना राॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालक राहुल शहारे यास ताब्यात घेत अटक केली. त्याने महेंद्र ढाेले याच्या सांगण्यावरून रेतीची उचल केल्याचे सांगताच पाेलिसांनी महेंद्रलाही अटक केली. त्यांच्याकडून दाेन लाख रुपयाचा ट्रक आणि सहा हजार रुपयाची दाेन ब्रास रेती असा एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक माेहाेड करीत आहेत.