नागपुरात मानव तस्करीप्रकरणी दिल्ली पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:23 IST2018-08-02T00:23:14+5:302018-08-02T00:23:59+5:30
मुलांच्या तस्करीच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेच्या घरावर धाड टाकली. मुलीच्या अपहरणाची ही घटना २९ जुलै रोजी दिल्लीतील अजमेरी गेट रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. दोन वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत प्रतीक्षालयात बसली होती. यादरम्यान मुलगी अचानक बेपत्ता झाली. महिलेने लगेच मुलीचा शोध घेतला. परंतु ती आढळून न आल्याने आरपीएफला माहिती दिली. आरपीएफने लगेच वायरलेस सेटवर सर्वांना अलर्ट केले.

नागपुरात मानव तस्करीप्रकरणी दिल्ली पोलिसांची धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलांच्या तस्करीच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेच्या घरावर धाड टाकली. मुलीच्या अपहरणाची ही घटना २९ जुलै रोजी दिल्लीतील अजमेरी गेट रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. दोन वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत प्रतीक्षालयात बसली होती. यादरम्यान मुलगी अचानक बेपत्ता झाली. महिलेने लगेच मुलीचा शोध घेतला. परंतु ती आढळून न आल्याने आरपीएफला माहिती दिली. आरपीएफने लगेच वायरलेस सेटवर सर्वांना अलर्ट केले.
आरपीएफ जवान मुलीचा शोध घेत होते. यावेळी त्यांना आॅटोस्टँडवर एक युवक मुलीसोबत आढळून आला. त्याला पाहून आरपीएफला संशय आला. त्यांनी त्याला लगेच पकडले. ती मुलगीही बेपत्ता झालेलीच होती. मुलीला पाहून तिच्या आईने ओळखले. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.
सूत्रानुसार तो युवक पाचपावली पोलीस ठाणे परिसरात राहतो. तो मानव तस्करीत सामील असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांची एक चमू नागपुरात दाखल झाली. या चमूने मंगळवारी युवकाच्या घरी धाड टाकली. सूत्रानुसार पाचपावलीत युवकाची पत्नी रंजिता राहते. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. असे सांगितले जाते की, युवक हा आॅटोमोटिव्ह चौकात सक्रिय तृतीयपंथी आणि संशयास्पद प्रवृत्तीच्या लोकांशी जुळलेला आहे. त्यामुळे तो मानव तस्करीतही सामील असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.