शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना

By योगेश पांडे | Updated: November 17, 2024 15:40 IST

पोलिसांना पाहून पळ काढत होते आरोपी, पादचाऱ्यांनादेखील उडविले

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. मात्र एका मुजोर कारचालकाने नाकाबंदीत कार न थांबविता पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अडविण्यासाठी धावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला फरफटत नेले. यात कर्मचारी जखमी झाला आहे. याशिवाय कारचालकाने दोन पादचाऱ्यांनादेखील उडविले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यू येथे ही घटना रात्री घडली.

शनिवारी माध्यरात्री भगवाघर चौक ते मोमीनपुरा चौकादरम्यान पोलिसांची नाकाबंदी होती. पोलीस कर्मचारी अनिल सहस्त्रबुद्धे (४०) हेदेखील कर्तव्यावर होते. अचानक दीड वाजताच्या सुमारास एमएच ०२ सीझेड ६२२१ या क्रमांकाची काळ्या रंगाची कार संशयास्पदरितीने आली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा दिला असता कारचालकाने वेग वाढविला व निघून गेला. सहस्त्रबुद्धे व बिट मार्शल्सने कारचा पाठलाग केला आणि कारला थांबविले. सहस्त्रबुद्धे हे कारच्या मागेच मोटारसायकल लावत असताना कारचालकाने वेगात गाडी रिव्हर्स घेतली. यामुळे कार थेट सहस्त्रबुद्धे यांच्या अंगावर आली. आरोपीने त्यांना फरफटत नेले. यात त्यांच्या पाठ, खांदा व पायाला मार लागला. त्यानंतर कारचालकाने पादचारी वहीद खान तसेच मोहम्मद शाहबाज यांना धडक दिली.

तसेच तीन ते चार मोटारसायकल, एका घराची पायरी व रेलिंगलादेखील धडक दिली. पोलिसांनी पाठलाग करून एका गल्लीत कारला अखेर थांबविले. पोलिसांनी कारचालक संकेत दिलीप कन्हेरे (२३, अष्टविनायक अपार्टमेंट, लुंबिनीनगर, मानकापूर), राहुल प्रेमलाल राऊत (३२, लुंबिनी बुद्धविहाराजवळ, खापरखेडा) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर सोहेल खान (२५, मानकापूर) हा पळून गेला. जखमींना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे घटनास्थळी खळबळ उडाली होती. सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला पालकांच्या हवाली करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी