उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 20:46 IST2019-10-26T20:45:14+5:302019-10-26T20:46:40+5:30
नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे.

उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना निवडणुकीतील खर्चाचा संपूर्ण हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. अनेक उमेदवारांनी अजूनही खर्चाचा हिशेब दिलेला नाही. नियमानुसार निवडणूक पार पडल्यानंतर २६ व्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना निवडणुकीचा पूर्ण खर्च सादर करावा लागणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर या विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’ (ए आर सी) बचत भवन सभागृह, जिल्हााधिकारी कार्यालय, नागपूर येथे १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच त्याच दिवशी काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक या विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’(ए आर सी) सरपंच भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नागपूर येथे होणार आहे.
निवडणूक खर्च अनुदेशाच्या सारसंग्रह फेब्रुवारी २०१९ मधील तरतुदीनुसार विधानसभा २०१९ ची निवडणूक लढविणाºया उमेदवारांची ‘लेखा पुनर्मेळ बैठक’ (ए. आर. सी.) निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यापासून २६ व्या दिवशी आयोजित करावयाची आहे.
सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.