भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 07:38 IST2024-03-10T07:38:03+5:302024-03-10T07:38:30+5:30
भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

भांडीकुंडी घेण्यास आली अन् चेंगराचेंगरीत दबली; नागपुरात भाजपच्या शिबिरातील दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबिरात चेंगराचेंगरी झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही महिला जखमी झाल्या.
मनूबाई तुळशीराम राजपूत (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. सकाळी १० वाजल्यापासून शिबिराची वेळ होती. मात्र, सकाळी सातपासूनच सुरेश भट सभागृहासमोर हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमली. सव्वादहानंतर सभागृहाचे दार उघडले असता, आत जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यामुळे गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरीदरम्यान मनूबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले.