शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

शहरातून आले, गावाबाहेर क्वारंटाईन झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:29 IST

अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेलतूरला राहणारा चंदू वर्षभरापासून कामासाठी पुण्यात राहायला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काम बंद झाले. साधन नसल्याने स्वत:ची सायकल घेतली आणि गावाकडे निघाला. सोबत गावचाच किरणही होता. अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.चंदू आणि किरण सध्या शाळेत राहत आहेत. घरचे लोक सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा शाळेत नेऊन देतात. हा डबा त्यांनाच स्वच्छ करावा लागतो. ते बाहेर निघू नयेत म्हणून बाहेरून लॉक करण्यात आले आहे. चेहºयावर निराशा आहे पण नाईलाज आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याला औंधजवळ एका कंपनीत काम करणारी दीपा कुही तालुक्यातील डोंगरदरा या गावी पोहचली. पण गावकऱ्यांनी तिला गावातील शाळेत ठेवले. त्या शाळेत बाहेरून आलेली एक मुलगी पूर्वीपासून वास्तव्यास होती. तिची आई घरून जेवणाचा डबा पोहचविते, दुरूनच बोलते. मनाला चटका लावणारी परिस्थिती आहे. दीपासोबत त्या दिवशी भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आदी गावच्या २२ मुली ट्रॅव्हल्सने नागपूरला पोहचल्या. एसटीने त्या आपल्या गावी गेल्या तेव्हा त्यांनाही असेच बाहेर ठेवण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावी दोन किमी दूर असलेल्या शाळेत बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून नातलग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात.गावोगावी सध्या हीच परिस्थिती आहे. शहरात नोकरी, काम व शिक्षण घेणारी गावची मुले जेव्हा परतली तेव्हा गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारला. गावाबाहेर राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवस राहण्याची सक्ती करण्यात आली. गावकऱ्यांच्या दबावापुढे नातलगही हतबल दिसून येत आहेत. गावी येऊनही दूर राहावे लागत असल्याने बाहेरून आलेल्यांमध्ये नैराश्य आहे. पण परिस्थितीपुढे सर्वांचे हात टेकले आहेत.डर के आगे जीत हैस्वत:ची सुरक्षा आणि भीतीमुळे गावकऱ्यांनी शहरातून आलेल्या आपल्याच माणसाला जवळ न घेता बाहेरच ठेवण्याची कठोर पावले ग्रामस्थांनी उचलली आहेत. मात्र या भीतीमुळेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, असे म्हणायला हरकत नाही. शहरात नियंत्रण ठेवणाºया यंत्रणा आहेत पण गावात हा धोका पसरला तर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावात येणारे मार्ग बंद केले, पहारा देणे सुरू केले. गावात येणाऱ्या बाहेरच्या माणसाला मज्जाव केला. त्यामुळे गावात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.