शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

केबलचे १५० रु.पेक्षा अधिक शुल्क घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:22 AM

ट्रायच्या नियमाप्रमाणे ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचे आवडीचे चॅनल्स दाखवावे व त्याप्रमाणेच मासिक शुल्क आकारावे. त्यानुसार केबल मालकांनी ग्राहकांकडून मासिक १५० रु.पेक्षा अधिक शुल्क आकारु नये, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतची मागणी : तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ट्रायच्या नियमाप्रमाणे ग्राहकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांचे आवडीचे चॅनल्स दाखवावे व त्याप्रमाणेच मासिक शुल्क आकारावे. त्यानुसार केबल मालकांनी ग्राहकांकडून मासिक १५० रु.पेक्षा अधिक शुल्क आकारु नये, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.ग्राहक पंचायतने विदर्भात सर्व्हे केला असता केबल मालक ग्राहकांवर सर्व तथा अनावश्यक चॅनल लादत असून त्यासाठी २५० ते ४०० रुपये मासिक शुल्क आकारत असल्याचे आढळून आले आहे. केबल मालकांनी नियमाप्रमाणे ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीचे चॅनल दाखवावे व ग्राहकांकडून फक्त त्याच चॅनलचेच मासिक शुल्क आकारावे. नको असलेले चॅनल्स दाखवून अनावश्यक अधिकचे शुल्क ग्राहकांवर लादू नये. ग्राहक जास्तीत जास्त १० चॅनलच्यावर बघत नाही त्यामुळे १० रु. चॅनल याप्रमाणे १०० रु. व मनोरंजन कर ४५ रु. असे एकून १५० रु.पेक्षा अधिकचे मासिक शुल्क ग्राहकांकडून घेऊ नये, असे ग्राहक पंचायतने म्हटले आहे.सेटटॉप बॉक्सच्या दरामध्ये बरीच तफावत असून ग्रामीण व शहरामध्ये कुठे १००० ते ३००० रु.पर्यंत सेटटॉप बॉक्सचे दर आकारले जातात, परंतु त्याची पावती दिली जात नाही. ही वस्तुस्थिती असून खरेतर सेटटॉप बॉक्सचे शुल्क हे डिपॉझिट असून ते ग्राहकांना परत करावे लागते, याकडेही पंचायतने लक्ष वेधले आहे.सध्या केबलच्या प्रक्षेपणामध्ये दिवसातून बरेचदा व्यत्यय येतो. स्पष्ट व व्यवस्थित प्रक्षेपण दाखविण्याची जबाबदारी ही केबल मालकांची आहे परंतु त्यांना तक्रारी केल्यास ते कंपनीकडे बोट दाखवितात त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घेऊन केबल ग्राहकांचे सर्वेक्षण करावे, केबल मालकांकडे असलेल्या सर्व ग्राहकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदी आहेत कां, ग्राहकांना पावत्या मिळतात का,त्याप्रमाणे शासनाकडे प्रत्येक ग्राहकांचे शुल्क जमा होते कां, शासनाचा महसूल तर बुडत नाही ना याचीही खातरजमा करावी. ग्राहकांकडून अधिकचे शुल्क घेणाऱ्या, प्रक्षेपण स्पष्ट व व्यवस्थित न दाखविणाºया तसेच सेटटॉप बॉक्सचे अव्वाच्या सव्वा पैसे घेणाºया केबल मालकांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, अशी मागणी पांडे,अध्यक्ष अ‍ॅड. स्मिता देशपांडे, सचिव संजय धर्माधिकारी, डॉ अजय गाडे, उपाध्यक्ष डॉ. नारायण मेहेरे, सुधीर मिसार, सहसंघटनमंत्री नरेंद्र कुळकर्णी, दत्तात्रय कठाळे यांनी केली आहे.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर