शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

३६० ठिकाणी केबल कार व रोपवे ; गडकरींची दुर्गम भागांसाठी नवी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:38 IST

गावागावात रोपवे, शहरात हायपरलूप! : वाहतुकीत बदल घडवणारी योजना

रांची/नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढच्या पिढीच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रूपरेषा तयार केली आहे. यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप, तर दुर्गम भागांसाठी रोपवे, केबल बस आणि फनिक्युलर रेल्वेचा समावेश आहे.

गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बैंक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत. याशिवाय, २५,००० किमी लांबीच्या दोन पदरी महामार्गाचे चार पदरीमध्ये रूपांतर करणे, प्रमुख मार्गावर इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट नेटवर्क उभारणे आणि दररोज १०० किमी रस्ते बांधकाम वाढवणे यावर मंत्रालय काम करत आहे. आम्ही नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देत आहोत. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडत आहे, असे गडकरी म्हणाले.

भारतामधील प्रवासाचा अनुभव बदलण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. याअंतर्गत, केवळ महानगरांवरच नव्हे तर दुर्गम ग्रामीण भागांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. आम्ही केदारनाथसह ३६० ठिकाणी रोपवे, केबल कार आणि फनिक्युलर रेल्वे बांधत आहोत. यापैकी ६० प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे, असे गडकरी म्हणाले. 

नागपूरमध्ये असेल पायलट प्रकल्पइलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी नागपूरमध्ये १३५ सीट असलेल्या इलेक्ट्रिक बससाठी निविदा काढण्यात आली आहे.या बसमध्ये एसीसह विमानाच्या दर्जाच्या सुविधा असतील आणि तिचा वेग १२०-१२५ किमी प्रतितास असेल. 

जगात कधीही तिसरे महायुद्ध भडकू शकतेकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी इस्रायल-इराण व रशिया-युक्रेन युद्धांचा संदर्भ देत जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. महासत्तांच्या हुकूमशाहीमुळे समन्वय, परस्पर सौहार्द आणि प्रेम संपत आहे आणि जगभरात संघर्षाचे वातावरण आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे कधीही तिसऱ्या महायुद्धाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सnagpurनागपूर