शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांच्या उत्तम प्रशासनासाठी ‘सीए व सीएस’नी संवेदनशील असावे

By admin | Updated: April 27, 2015 02:17 IST

वित्तीय क्षेत्रात कंपन्यांच्या उत्तम प्रशासनासाठी चार्टर्ड अकाऊन्टंट (सीए) आणि कंपनी सेक्रेटरी (सीएस) या व्यावसायिकांनी ....

नागपूर : वित्तीय क्षेत्रात कंपन्यांच्या उत्तम प्रशासनासाठी चार्टर्ड अकाऊन्टंट (सीए) आणि कंपनी सेक्रेटरी (सीएस) या व्यावसायिकांनी अधिक संवेदनशील राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी रविवारी येथे केले. इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरिज आॅफ इंडियाच्या (आयसीएसआय) नागपूर शाखेतर्फे ‘सचिवी लेखा परीक्षा’ (सेक्रेटरियल आॅडिट) या विषयावर आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दर्डा बोलत होते. मंचावर आयसीएसआयचे अध्यक्ष अतुल मेहता, केंद्रीय समितीचे सदस्य आशिष गर्ग, नागपूर शाखेचे अध्यक्ष मनीष राजवैद्य आणि सचिव तुषार पहाडे होते. दर्डा म्हणाले, वित्तीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी केवळ कायदे करून किंवा अनुशासन समिती करून चालणार नाही, तर सीए आणि सीएस यांना व्यावसायिक आणि समाजाप्रति संवेदनशील व्हावे लागेल. देशात एकीकडे ३४ लोकांना निवारा नाही तर दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए २.२४ कोटींवर गेला आहे. हा तर लोकांच्या पैशाचा दुरुपयोग आहे. याकडे सीए आणि सीएसने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच कॉर्पोरेट घोटाळ्यावर जास्त दक्ष राहावे लागेल, नाही तर सत्यम कॉम्प्युटर आणि गोल्डमन सॅचेस यासारखे घोटाळे होतच राहतील, असा इशारा दर्डा यांनी दिला. दर्डा म्हणाले, उत्तम प्रशासन कायद्याच्या चौकटीत न राहता तो सवयीचा भाग बनावा. कॉर्पोरेट जगतात समभागधारकांचा विश्वास हा महत्त्वाचा असतो. तो कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी सीए आणि सीएसची आहे. दर्डा यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. कायद्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी कलाम खासदारांचे वर्ग घ्यायचे. त्याचा उपयोग आम्हाला जीवनात होत असल्यावर दर्डा यांनी भर दिला. प्रारंभी अतुल मेहता म्हणाले, पहिल्यांदा कंपनी कायदा-२०१३ मध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना सचिवीय लेखा परीक्षा बंधनकारक केली आहे. त्यांनी स्वतंत्र संचालकांचे अधिकार आणि कंपनीच्या बोर्डावर महिला संचालकांची नियुक्ती बंधनकारक असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. भारतात कॉर्पोरेट कंपन्यांसाठी असलेल्या कठोर नियंत्रण नियमामुळे उत्तम प्रशासन दिसून येते. त्यामुळे एका रात्रीतून गायब होणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे शक्य आहे. आशिष गर्ग म्हणाले, कंपनी कायदा-२०१३ मध्ये कंपनी सेक्रेटरीवर मोठी जबाबदारी टाकली आहे. सर्व कंपन्यांसाठी कायदेशीर लेखा परीक्षाप्रमाणेच सध्या सचिवीय लेखा परीक्षा बंधनकारक केली आहे. नागपूर शाखेचे अध्यक्ष मनीष राजवैद्य यांनी स्वागतपर भाषण दिले. यावेळी वरिष्ठ सीएस आणि सीए ओ.पी. बागडिया यांचा मेहता यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आयसीएसआयचे संचालक (अनुशासन) अशोक दीक्षित, रायपूर शाखेचे अध्यक्ष वाय.सी. राव, नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष मुकेश पारख आणि या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तुषार पहाडे यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर समूह चर्चेसह चार तांत्रिक आणि प्रश्नोत्तर सत्र पार पडले. (प्रतिनिधी)