चाकु घेऊन धुमाकुळ घालणाऱ्या बुलेटला केले गजाआड
By दयानंद पाईकराव | Updated: May 4, 2024 17:49 IST2024-05-04T17:48:42+5:302024-05-04T17:49:12+5:30
Nagpur : चाकु घेऊन दहशत फैलवणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केले गजाआड

Bullet named accuse arrested after he found with the knife
नागपूर : चाकु घेऊन धुमाकुळ घालणाऱ्या बुलेट नावाच्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. कुलदिप उर्फ बुलेट उर्फ दिप प्रदिप हरले (२२, रा. बोबडे ले आऊट, एलजी टाऊन महाजनवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार हे शुक्रवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास गुन्हेगाराच्या शोधात गस्त घालत होते. त्यांना महाजनवाडी डी मार्ट मागील परिसरात
सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती हातात चाकु घेऊन धुमाकुळ घालत शिविगाळ करताना दिसला. पोलिस तेथे गेले असता आरोपी बुलेट पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास अटक केली. त्याच्या ताब्यातून २०० रुपये किमतीचा लोखंडी चाकु जप्त करण्यात आला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी बुलेटविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.