शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बिकट अवस्था! कुठे धोकादायक इमारती तर कुठे उघड्यावर भरते शाळा

By गणेश हुड | Updated: December 6, 2022 14:59 IST

नागपूर जिल्ह्यातील ८८ शाळांच्या इमारती जीर्ण, धोकादायक; बांधकाम व दुरुस्तीसाठी ११.७३ कोटींची मागणी

नागपूर : शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राजर्षी शाहू महाराज यांनी २४ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी केली होती. आजही मोफत व सक्तीचे शिक्षणाचा कायदा आहे. परंतु बांधकामासाठी निधी नसल्याने ग्रामीण भागातील शाळांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील ८८ शाळांतील इमारती जीर्ण व धोकादायक झाल्याने कुठे धोकादायक इमारतीत तर कुठे उघड्यावर झाडाखाली शाळा भरत आहे.

शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८८ शाळांतील वर्गखोल्या धोकादायक आहेत. काही वर्ग खोल्यांना तडे गेले आहेत. तसेच पावसाळ्याच्या. दिवसात या इमारतीच्या छतातून, भिंतीमधून इमारतीच्या आत पाणी झिरपते तर कुठे छत गळते. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी निर्माण होतात. अशा धोकादायक खोल्यात वर्ग भरत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. जीर्ण खोल्यांना पाडून नवीन वर्गखोल्यांचे तातडीने बांधकाम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने याचाही निधी रोखला आहे. शाळा इमारती बांधकाम प्रस्ताव एक-दोन वर्षापूर्वीचे आहे.

११.७३ कोटींचा निधी मंजूर

जिल्हा परिषदेच्या ८८ शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण व धोकादायक आहेत. बांधकामासाठी ११ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर आहे. परंतु शासनाने निधी रोखल्याने बांधकाम थांबले आहे. काही गावांत अशा धोकादायक इमारतीत शाळा भरते. यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंडीखापा गावात झाडाखाली भरते शाळा 

काटोल तालुक्यातील माळेगाव गट ग्रामपंचायत मधील गोंडीखापा गावातील प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाल्याने चार पैकी एकच एकच खोली उरली आहे. बांधकामाचा प्रस्ताव मंजूर आहे. यासाठी १३ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. मात्र शासनाने निधी थांबविल्याने विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून शाळेच्या आवारातील झाडाच्या कुशी बसून शिक्षण घेत आहे. गोंडीखापा गावात असलेली प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने या शाळेच्या इमारतीत असलेल्या चारपैकी तीन वर्गखोल्या २०१९मध्ये जमीनदोस्त करण्यात आल्या कोरोना काळ गेला आणि लागलीच प्रस्ताव शासनाकडे पाठविला. फक्त एक वर्गखोली बांधण्याला मंजुरी मिळाली. परंतु हा निधी रोखला आहे.

तालुकानिहाय स्थिती

*तालुका - धोकादायक वर्गखोल्या - मंजूर निधी (लाखांत)*

  • नागपूर - ७ - ९२.०५
  • मौदा - ६ - ८०.००
  • काटोल - ८ - १०८.००
  • नरखेड - ७ - ९२.००
  • कळमेश्वर - ६ - ८०.००
  • कामठी - ६ - ८०.००
  • उमरेड - ५ - ६६.०५
  • रामटेक - ६ - ८१.००
  • सावनेर - ७ - ९४.०५
  • कुही - ८ - १०६.००
  • भिवापूर - ७ ० ९५.०५
  • हिंगणा - ९ - ११९.००

एकूण - ८८ - ११७३.००

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाnagpurनागपूरzpजिल्हा परिषद