नंदनवन येथील इमारतीला आग, चौघांना केले रेस्क्यू
By मंगेश व्यवहारे | Updated: March 8, 2023 14:57 IST2023-03-08T14:56:37+5:302023-03-08T14:57:34+5:30
आगीत वरच्या माळ्यावर राहणाऱ्या पेशने कुटुंबातील पतीपत्नी व दोन मुले अडकली होती

नंदनवन येथील इमारतीला आग, चौघांना केले रेस्क्यू
नागपूर : केडीके कॉलेज रोड नंदनवन येथील इमारतीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत वरच्या माळ्यावर राहणाऱ्या पेशने कुटुंबातील पतीपत्नी व दोन मुले अडकली होती. अग्नीशमन विभागाचे पथक तत्काळ पोहचून आगीत अडकलेल्या चौघांनाही रेस्क्यू केले.
या इमारतीच्या खाली असलेल्या रेडिमेड कापडाच्या दुकानाला आग लागली होती. वरच्या माळ्यावर पशीने कुटुंबिय वास्तव्यास आहे. आगीचा धूर संपूर्ण इमारतीत पसरला होता. त्यामुळे पशिने कुटुंबातील सर्व सदस्य टॅरीसवर पोहचले. आगीतून जीव वाचविण्यासाठी ते उडी मारणार होते. पण अग्निशमन विभागाचे पथक वेळेत पोहचल्याने चारही सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. लकडगंज व सक्करदरा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहचले होते. तीन बंबाच्या मदतीने रात्री ११ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.